हिंदुत्ववाद्यांच्या हत्यासत्रानंतर आता साधूंचे हत्यासत्र; हिंदूंना संपवण्याचे पद्धतशीर षड्यंत्रच ! – हिंदु जनजागृती समिती

पालघर, बुलंदशहर, लुधियाना आणि आता नांदेड; देशभरात साधूंचे हत्यासत्र चालूच !

साधू-संतांची भूमी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात आता साधूंच्या रक्ताचे पाट वाहायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधूंच्या हत्यांचे सूतक संपत नाही, तोच उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका साधूंची हत्या झाली. त्यानंतर लगेच पंजाबमधील होशियारपूरमध्ये एका साधूंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आता नांदेड जिल्ह्यात श्री ष.ब्र.१०८ सद्गुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज आणि त्यांच्या एका सेवकाची मध्यरात्री निघृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. समाजाची निष्काम सेवा करून समाजाला दिशा देणार्‍या त्यागमूर्ती साधूंची हत्या होणे, हे अत्यंत दु:खदायक आणि संतापजनक असून हिंदु जनजागृती समिती या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर आज देशभरातील विविध राज्यांत हिंदू साधूंना वेचून ठार मारले जात आहे. त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. यापूर्वी अनेक राज्यांत हिंदुत्ववाद्यांच्या हत्यांचे षड्यंत्र रचून त्यांच्या हत्या केल्या जात होत्या; आता याच प्रकारे हिंदु साधूंना पद्धतशीरपणे संपवण्याचे षड्यंत्र चालू झाल्याचे दिसून येत आहे. यामागे कोण आहे, याच्या मुळापर्यंत जाऊन षड्यंत्राचा शोध घ्यायला हवा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

साधूंची हत्या करणार्‍यांना कोणत्याही प्रकारे शासनाचे वा कायद्याचे भय राहिलेले नाही, असेच दिसत आहे. वारंवार साधूंच्या होणार्‍या हत्या समाजमन प्रक्षुब्ध करत आहेत. या हत्या रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदा करायला हवा. तसेच जलदगतीने तपास करून जे कोणी षड्यंत्रकारी असतील, त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
एखाद्या गावात एका मुसलमानाची कोणत्याही कारणाने का होईना, हत्या झाली की कम्युनिस्ट आणि मुसलमान यांची युती ‘मॉब लिंचिंग’ची बांग ठोकतात. तसेच समाजातील तथाकथित बुद्धीवादी, पुरोगामी वर्ग ‘अवॉर्ड वापसी’च्या माध्यमातून या घटनांसाठी गळा काढतात; मात्र हिंदु साधूंच्या होणार्‍या हत्यांबाबत मूग गिळून गप्प बसतात. कोणी ‘अवॉर्ड वापसी’ करत नाही, कोणी ‘मॉब लिंचिंग’ म्हणत नाही, कोणाला ‘भारतात रहायची भीती वाटते’ असे वाटत नाही. हे चित्र दुर्दैवी आहे. हिंदु साधूंच्या हत्यांबाबत मूग गिळून गप्प बसणार्‍यांचाही आम्ही निषेध करत आहोत. तसेच हिंदू समाजानेही साधूंच्या हत्यांच्या विरोधात सनदशीरमार्गाने आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.