मुंबईतून सुमारे तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१९ :- मुंबईतून सुमारे तीन लाख रुपयांचे संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.

हेही वाचा :- डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या घरातील दिवेबंद आणि घंटानाद आंदोलन

मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर येथील एका तूप भांडार गोदामावर ही कारवाई करण्यात आली. गोदामातून २ लाख ९९ हजार ९० रुपये किंमतीचे चारशे किलो तूप जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या तुपाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा :- डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात मिठाईंची विक्री होते. त्यामुळे मिठाईत भेसळयुक्त पदार्थ मिसळण्याची शक्यता असते. दिवाळीच्या दिवसात ग्राहकांना आरोग्यदायी व चांगले अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न नमुने तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.