आदित्य ठाकरे यांची डोंबिवली ठाकुरलीत प्रॉपरटी

डोंबिवली दि.०४ :- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आपल्या नावे असणाऱ्या स्थावर मालमत्तेमध्ये कल्याणजवळील ठाकुर्लीमध्ये तसेच ठाण्यातील घोडबंदर रोड येथे गाळा असल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असून ४ कोटी ६७ लाख ६ हजार ९१४ रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये ठाकुर्ली आणि ठाण्यातील गाळ्यांबरोबरच रायगडमधील शेतजमीनीचाही उल्लेख आदित्य यांनी केला आहे.

हेही वाचा :- बापाने आपल्या पोरासाठी जे कराव ते पवार साहेबांनी माझ्यासाठी केलं- जितेंद्र आव्हाड

आदित्य यांनी आपल्यावर कोणत्याप्रकारचे कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आदित्य यांचे वडील उद्धव ठाकरे यांची संपत्ती १ कोटी ६४ लाख १६ हजार ३०२ रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्याकडे चारचाकी गाडी नसल्याचे म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये आदित्य यांनी आपल्याकडे १३ हजार ३४४ रुपये रोख रक्कम (कॅश) असून उद्धव यांच्याकडे ३९ हजार १२३ रुपये असल्याची माहिती दिली आहे. आदित्य यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये २६ लाख ३० हजार ५६० रुपयांचा आयकर भरला आहे. तर याच वर्षीमध्ये उद्धव ठाकरेंनी २ लाख ४ हजार ७८० रुपये आयकर भरला आहे. विशेष म्हणजे आदित्य यांच्या आयकर रकमेमध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहित नाही… सगळ्यात मोठा विनोद

Leave a Reply

Your email address will not be published.