आदित्य ठाकरे आणि राज्यपाल बैस यांची राजभवनवर भेट अर्धा तास चर्चा
मुंबई दि.१० :- आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सर्वांना प्रतिक्षा असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी दोघांमध्ये सुमारे अर्ध्या तासांहून अधिक काळ चर्चा झाली. सत्तासंघर्षाच्या निकालाला काही तास बाकी असताना ठाकरे यांनी राजभावनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
‘म्हाडा’ कोकण मंडळ घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजभवनावर जाऊन राज्यपाल बैस यांची सदिच्छा भेट घेतली होती. राज्यपालांच्या निमंत्रणाला मान देऊन शिंदे भोजनासाठी राजभवनावर गेले होते. आमदारांची अपात्रता, राज्यपालांच्या बहुमत चाचणीचा आदेश वैध की अवैध, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचे कार्यक्षेत्र अशा सगळ्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
मुंबई मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर २३ अखेरीस पूर्ण होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गेले काही महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतले. घटनापीठातील एक न्यायमुर्ती १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने येत्या दोन दिवसांत निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.