अभिनेते शरद पोंक्षे यांना स्वा. सावरकर पुरस्कार

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०२ :- आजच्या घडीला नवीन येणाऱ्या पिढीला सैनिकी क्षेत्रात तसेच पोलीस म्हणून काम करण्यात रस राहिलेला नाही याचे कारण आम्ही सावरकर शिकविले नाही म्हणून ते आम्हाला कळलेच नाहीत आणि यातून देशाचे नुकसान झाले असल्याची खंत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पोंक्षे यांना स्वा. सावरकर पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा शुभदा जोशी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी त्यांच्यासह त्यांच्या आई व पत्नी उपस्थित होत्या.

हेही वाचा :- ठाण्यात पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन

निवडणुकांच्या निकाला नतर मला सावरकरांची उणीव भासली असे म्हणत भाषणाची सुरुवात केली. यात लोकशाही आणण्याची गरज आहे का असा सवाल सावरकर यांना विचारला असता त्यांनी सांगितले होते कि सद्य स्थितीत या देशात लष्करशाही आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावेळी त्याना विचारणा झाली होती कि मग तुम्ही या देशात लोकशाही कधी आणणे गरजेचे समजता त्यावेळी ते म्हणाले कि स्वातंत्र्य मिळाल्या नंतर पहिल्या २ महिन्यात जन्माला येणार बाळ ज्यावर्षी २१ वर्षाचे होईल त्यावेळेस मी यादेशात लोकशाही आणीन असे उत्तर दिले होते अशी आठवण पोंक्षे यांनी यावेळी सांगितली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email