ठळक बातम्या

अभिनेते अंकुश चौधरी यांचे आगळे रक्षाबंधन!

मुंबई दि.०५ :- माजी ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक व रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा लोकमान्य टिळक रुग्णालयात साजरा झाला. प्रिया वाखरीकर(५३) या लोकमान्य टिळक रुग्णालयात गेली ३० वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. २२ जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामावर निघालेल्या प्रिया यांच्यावर नियतीने घाला घातला. आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे लोकल पकडताना झालेल्या अपघातात त्यांना डावा पाय आणि डावा हात गमवावा लागला. सध्या त्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावर्षीचा रक्षाबंधन सण त्यांना कायम स्मरणात राहील अशा प्रकारे साजरा झाला.

बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ५ ऑक्टोबरपासून बंद

त्यांचा आवडता अभिनेता अंकुश चौधरी भाऊ म्हणून रुग्णालयात त्यांना भेटायला आला. मुळ्ये काकांच्या विनंतीला मान देऊन आलेल्या अंकुशने प्रिया यांच्या हातावर राखी बांधली, त्यांचे औक्षण केले आणि प्रेमाची भेट म्हणून त्यांना साडी दिली. कृत्रिम हात व पाय यांच्या बळावर ‘रुग्णसेवा ही ईश्वर सेवा’ हे आपले व्रत मी यापुढेही सुरू ठेवेन, असे प्रिया यांनी सांगितले तर हे नाते आजच्या दिवसापुरते नसून आयुष्यभरासाठी असेल अशी ग्वाही अंकुशने दिली. हा प्रसंग आनंद देणारा असला तरी असे प्रसंग माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ नयेत, असे मुळ्ये काकांनी सांगितले. रुग्णालयातील प्रमुख अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

करंजा ते रेवस जलमार्गाने बोटीतून दुचाकी घेऊन प्रवास करण्याची सुविधा पुन्हा सुरू

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला मुळ्ये काकांनी उपचारांकरिता आर्थिक मदत मिळवून दिली. मोनिका रुग्णालयात असताना तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अभिनेते भरत जाधव यांना घेऊन ते तिला भेटायला गेले होते.‌ घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या पण घटस्फोट न घेता पुन्हा जोडीने नवे आयुष्य सुरु करणा-या काही जोडप्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, कर्करोगावर जिद्दीने मात करून बरे झालेल्या कर्करोगमुक्तांचा मेळावा, ज्येष्ठ रंगकर्मी संमेलन, माझा पुरस्कार हे आणि इतर अनेक आगळे कार्यक्रम मुळ्ये काकांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंत सादर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *