* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> कल्याण रेल्वे स्थानकात चार हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
गुन्हे-वृत

कल्याण रेल्वे स्थानकात चार हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल

कल्याण दि.१८ :- कल्याण रेल्वे स्थानकात चार हजार ४३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येऊन १६ लाख ८५ हजार रुपये दंड एका दिवसात वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेतील १६७ तिकीट तपासणीसांच्या विशेष पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी दिवसभर विशेष तपासणी मोहीम राबवली.

दाट धुके पसरल्याने मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक उशिराने

लोकल, मेल, एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणारा एकही प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर जाऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे ३० हून अधिक जवान फलाट क्रमांक एक ते सातवर उपस्थित होते. कल्याण रेल्वे स्थानका लोकल आणि मेल एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

ज्येष्ठ प्रकाशक माधव त्रिंबक परचुरे यांचे निधन

फुकट्या प्रवाशांपैकी अनेकांनी उत्तर प्रदेश, बिहार येथून विनातिकीट प्रवास केल्याचे समोर आले. काही विनातिकीट प्रवाशांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *