मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
मुंबई दि.०६ :- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण १२ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून, १८ हजार ५०० रुपयांची दंड वसूल करण्यात आला.
फेरीवाला विरोधी पथकाने १ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुंबई विभागातील बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ, सामानाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. या पथकाद्वारे फेरीवाला विरोधी पथकाकडून पुष्पक, गोरखपूर, गोदान, पवन, गितांजली आणि देवगिरी या एक्स्प्रेसमध्ये तपासणी करण्यात आली.
मेट्रो ७ अ मार्गिका; दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात
या पथकाने तिकीट हस्तांतरणाची १२ प्रकरणे शोधून काढून १३ हजार ५१० रुपये दंड तर तिकिटांच्या अनधिकृत विक्रीची दोन प्रकरणे शोधून एक हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन दलालांना पकडण्यात आले. त्याचबरोबर पथकाने कलम १३७ अंतर्गत १२ फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यात आली.