वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणी डब्यातील फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई; ८६ लाखांचा दंड वसूल

मुंबई दि.१० :- वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणी डब्यातील फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली असून या फुकट्या प्रवाशांकडून ८६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या डब्यातील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोयीचा होत आहे.

ठाणे महापालिका निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण

त्यामुळे तिकीट तपासणीसह भरारी पथके कार्यरत आहेत. एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत २० हजार विनातिकीट प्रवाशांकडून ८६ लाख रुपये दंड वसूल केला. प्रथम श्रेणी डबा, वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी होत नसल्याने विनातिकीट प्रवाशांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले होते.

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने यांच्याकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठीची याचिका मागे

याला आळा घालण्यासाठी दैनंदिन तिकीट तपासणी कडक करण्यात आली आहे. तिकीट तपासनिसांचे भरारी पथक प्रत्येक रेल्वे स्थानकात, प्रत्येक लोकलच्या डब्यात जाऊन तपासणी करत आहेत. मुंबई विभागाने एप्रिल २०२३ महिन्यात २० हजार ७६० विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून ८६ लाख १८ हजार ८२८ रुपयांचा दंड वसूली करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.