ठळक बातम्या

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

मुंबई दि.०८ :- मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणा-या २०२३ च्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल – लोकल वाहतूक मुंबई सेंट्रलपर्यंतच सुरू

आचार्य अत्रे यांचे नातू अ‍ॅड. राजेंद्र पै पुरस्कृत सदर पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह अशा स्वरुपाचा आहे. यंदा आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती असून ऑगस्ट महिन्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार वैद्य यांना प्रदान करण्यात येणार आहे.

गावदेवी मंदिराजवळ उभारलेली बेकायदा इमारत तोडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त द्या

वैद्य ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रीय असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे ते तीनदा अध्यक्ष होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाचनालय संस्कृती वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *