मधु मंगेश कर्णिक यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार जाहीर
मुंबई दि.०७ :- ज्येष्ठ साहित्यिक मधुमकेश करणे यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे अत्रेय या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो येत्या 13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती आहे त्या दिवशी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
एडलवाइज कंपनीच्या अधिकाऱ्यांना उद्या खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीला आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पुरस्कार वितरण सोहळा दुपारी चार वाजता माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाने
अशोक हांडे लिखित ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे. हा पुरस्कार याआधी मंगेश पाडगावकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अण्णा हजारे, डॉ. जयंत नारळीकर, मधुकर भावे, रामदास फुटाणे, पं. हृदयनाथ मंगेशकर, द मा. मिरासदार डॉ. तात्याराव लहाने आणि दिवंगत रानकवी ना. धो. महानोर यांना देण्यात आला होता.