भरधाव रिक्षाचा अपघात ,प्रवासी जखमी

डोंबिवली दि.२३ – डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या ब्ल्यू जेम सोसायटी मध्ये राहणाऱ्या चित्रा देवाडिगा आपले पती ,आणि मुलीसह डोंबिवली पश्चिम सम्राट चौक येथून रिक्षा पकडून काटईच्या दिशेने जात होते. सदर रिक्षा चालक रिक्षा भरधाव वेगाने चालवत होता रिक्षा डी एन सी शाळेजवळ पोहचताच वळणावर रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा एका बाजूला पलटी झाली. या अपघातात चित्रा यांच्यासह त्याचे पती व मुलगी यांना दुखापत झाली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात भरधाव वेगाने रिक्षा चालवत प्रवाशांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी रिक्षा चालक अनिल कुमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email