अभाविपचा डोंबिवलीत जल्लोष
केंद्र शासनाने जम्मू काश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल अभाविप डोंबिवली शाखेत जल्लोष साजरा करू पेढे वाटले. अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेस फटाके फोडून आणि घोषणा देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. जहाँ हुआ तिरंगे का अपमान, वहीं करेंगे उसका सम्मान.. असा नारा देत दि. 11 सप्टेंबर 1990 रोजी अभाविप च्या “चलो कश्मीर” आंदोलनात भारतभरातून लाखो विद्यार्थी जम्मू मधे धडकले होते.. आणि आज प्रत्यक्ष तो आनंदाचा क्षण जल्लोषात साजरा करण्यात आला.
शहरमंत्री अलोक तिवारी, सहमंत्री दीपक शर्मा, कोंकण प्रांत मधून मिहीर देसाई, जिल्हा कार्यकर्ते अमोल सोळंके, संघटनमंत्री प्रेरणा पवार, आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
Please follow and like us: