बारवी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबियांना सुमारे २५ कोटींचे वाटप

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०७ – ठाणे जिल्हयाला पाणी पुरवठा करणार्या बारवी धरणाची उंची वाढवण्यात येत असल्याने विस्थापित होणा-या १२०४ कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात येत असून काचकोळी, मेाहघर, मानिवली, सुकाळवाडी, कोळे वडखळ,तोंडली या गावातील बाधितांना भूखंडाचे वाटप व आर्थिक भरपाई देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, सुमारे २५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येत आहे यामुळे येत्या पावसाळयात बारवी धरणाची ऊंची वाढवण्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याची वाढती मागणी व भविष्यातील गरज लक्षात घेऊन औद्योगिक विकास महामंडळाने १९९८ साली बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे राज्य शासनानेच आता येत्या पावसाळयापूर्वी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश दिले असून औद्योगिक विकास मंडळ त्या दृष्टीने गेले काही महिने पाठपुरावा करत होती त्याला आता यश आले असून आज ७२ प्रकल्पग्रस्ताना भूखंडाचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा :- डोंबिवली ; काचबिंदूच्या जनजागृतीसाठी १० तारखेला प्रभातफेरी

या गावातून प्रकल्पग्रस्ताना शाळा ,घर,मंदिर,रस्ते,प्रथमिक सुविधांसह कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले त्या दृष्टीने शासनाने २४३ जणांची नावे अंतिम केली असून लवकरच या संदर्भात जाहिरात मंडळातर्फे दिली जाणार आहे.बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर पाणीसाठा ३४०.८६ दलघमी इतका म्हणजे दुप्पट होणार आहे  बारवी धरणाची साठवण क्षमता १८१ दशलक्ष धनमीटर इतकी होती धरणाला बसवण्यात आलेले दरवाजे बंद केलेले नसल्यामुळे २३२.५० दशलक्षधनमीटर इतकेच साठवता येणार आहे.म्हणजेच धरणात ६८.६० मीटर ऊंची पर्यत पाणीसाठा करता येत आहे. येत्या दोन महिन्यात प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप व इतर कामे पूर्ण करण्यात येत असून स्थानिक आमदार किसन कथोरे यांचे हस्ते शुक्रवार ८ मार्च रेाजी करण्यात येत असल्याचे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email