* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> शिक्षणाधिकाऱ्याच्या घरात सापडलं तब्बल 6 कोटींचं घबाड, कुठून आली इतकी संपत्ती ? – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

शिक्षणाधिकाऱ्याच्या घरात सापडलं तब्बल 6 कोटींचं घबाड, कुठून आली इतकी संपत्ती ?

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अडणची वाढल्या आहेत. कारण लोहार यांच्या घरात सहा कोटी रूपयांची बेनामी संपत्ती आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी आता लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने सोलापूरमध्ये एकच खळबळ माजली आहे.

केंद्रीय मंत्री कराड यांचा लोकल ट्रेनने प्रवास

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या सात कोटी रूपयांच्या ग्लोबल शिक्षक पुरस्काराचे मानकरी असलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन शिक्षक रणजितसिंह डिसले तीन वर्षे नेमणुकीच्या गैरहजर राहिल्याने तसेच त्यांनी अमेरिकेत संशोधन शिष्यवृत्तीसाठी मागितलेली रजा नाकारल्यामुळे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे चर्चेत आले होते. या घटनेच्या काही दिवसानंतर एका शिक्षण संस्थाचालकाकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किरण लोहार यांच्या मालमत्तेची चौकशी केली होती. या चौकशीत 15 नोव्हेंबर 1993 ते 31 आॕक्टोंबर 2022 या कालावधीत लोहार कुटुंबीयांकडे कायदेशीर मालमत्तेपेक्षा तब्बल 112 टक्के जास्त भ्रष्ट व अवैध मार्गाने मिळविलेली मालमत्ता आढळून आली आहे. या मालमत्तेची एकूण रक्कम 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रूपयांच्या घरात आहे.

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’- रमेश शिंदे

दरम्यान आता लोहार कुटुंबियांच्या घरात गैरमार्गाने कमावलेली मालमत्ता सापडल्याने शिक्षणाधिकारी किरण लोहार (वय 50), पत्नी सुजाता (वय 44) आणि मुलगा निखिल (वय 25, तिघे रा. आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता.करवीर, जि.कोल्हापूर) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार आता लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *