बीएसयूपीतील घरातील दलितांना घरा बाहेर काढण्या साठी प्राणघातक हल्ला

(बालकृष्ण मोरे)

तीन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याने प्रकृती गंभीर

कल्याण / कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात पालिकेने बीयुसीपी ची घरे बांधलेली आहेत त्याचा कोणी ताबा घेऊन नये म्हणून जमीन मालकांनी दहशत घडवून आणून चार जणांवर तलवारीने घरांत घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे,हल्ला जाधव कुटूंबियांनी केल्याचा आरोप जमावाने केला असून अट्रोसिटी , जीवे मरण्याची प्रयत्न, विविध कलामांतर्गत १५ जणांवर गुन्हे दाखल करून पुढील तपास खडकपाडा पोलिस करीत आहेत.या हल्ल्यात तिघांची प्रकृती गंभीर झंझाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने साठे नगर मधील डम्पिंग ग्राउंड जवळ राहनारूआ नागरिकांना उंबर्डे गावात बी.एस. यु.सी.पी अंतर्गत घरे बांधून दिली आहेत मात्र स्थानिक जमीन मालकांचा याला विरोध आहे. दिवसंदिवस या भागात बिल्डरांनी आपले बस्तान मांडल्याने या वस्ती मुळे सोसायटीत उच्छभ्रू लोक येणार नाही त्यामुळे तोटा सोसावे लागेल या भीतीने बीएसयुसीपी योजनेत नागरिकांनी घरांचा ताबा घेऊ नये यासाठी चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला आहे दहावीत कमळाकर इंचाळ , सुनिल इंचाळ अरुण जगताप , करण नाटकर, या चौघांवर लोखंडी रॉड , तलवारीने घाव करण्यात आले आहेत .तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पोलिसांनी कल्याण पश्चिम उंबर्डे येथे बी एस यु पी प्रकल्पा अंतर्गत शासनाकडून मिळालेल्या मोफत घरात राहणाऱ्या नागरिकांना उबर्डे गावातील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध करत तलवारी ,लोखंडी रॉड कोयता लाठ्या घेउन इमारती मध्ये घुसून तिघावर प्राण घातक हल्ला करत या इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करत,महिलांशी अश्लील चाळे करत हा परिसर सोडून जाण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सात च्या सुमारास घडली .या टोळक्याने या इमारतीच्या परिसरात राहणार्या गाड्यांची देखील तोडफोड करत नुकसान केली .

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी हरीश जाधव ,किरण, ,राहुल भैय्या ,बाळ्या,किशोर मेहेर ,भूषण जाधव ,सोपान पंजे यांच्यासह १० ते १५ अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे . जाधव कुटूंबियांनी केला असल्याची माहिती जमावकडून समोर येत आहे .

दरम्यान खडकपाडा पोलीस ठाण्यात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती,असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा मोठे आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी जमीन मालकांची दादागिरी व मुजोरी ला लगाम लावण्याची गरज भासू लागले आहे नाही तर असे हल्ले होतच राहतील असे बोलले जात आहे.

या पूर्वी पत्रकार राजू काउतकर यांच्या वर या ठिकाणीच प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात राजु काउतकर हे गंभीर जखमी झाले होते.या वेळी त्यांना मीरा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.आता बीएसयूपीच्या घरात घूसून मारहाण करणारे काही आरोपी हे राजू काऊतकर यांच्यावर हल्ला करण्याच्या वेळेस देखील होते.

या उबर्डे येथील बीएसयूपी घरांच्या बांधकामाच्या वेळेस येथील दोन रखवालदार यांचे देखील खून झाले होते .या दोन रखवालदारांच्या खुनातील जामिनावर सुटलेला आरोपी देखील या बीएसयुपी घरात राहणाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी हल्ल्याच्या वेळेस होता.
—————————————–———————–

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email