एक्झिमा आणि बहुतांश व्यसने यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारण

संशोधनाचा निष्कर्ष ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने शोधनिबंध सादर

मुंबई दि.०४ :- एखादी व्यक्ती व्यवनाधीन होण्याची कारणे ३० टक्के कारणे शारीरिक असतात, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून असतात, तर ३० टक्के कारणे मानसिक आणि ४० टक्के कारणे आध्यात्मिक स्वरूपाची असतात. ‘एक्झिमा’ आजाराची (त्वचारोग) ३० टक्के प्रकरणे केवळ आध्यात्मिक स्वरूपाची असतात.

आता सरकारी योजनांचेही (Reels)… ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचा आगळा प्रयोग

अशा वेळी अध्यात्मशास्त्रानुसार योग्य साधना आणि नामजप आदि उपाय केले, तर व्यसने अन् विकार यांवर लवकर मात करता येते, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने शॉन क्लार्क यांनी केले. फरिदाबाद येथे झालेल्या ‘सी 20 इंटेग्रेटेड होलिस्टिक हेल्थ कार्यक्रमात ‘अध्यात्माद्वारे व्यसनाधीनता आणि एक्झिमा यांवर मात कशी करता येते’, या विषयावर शोधनिबंध सादर करतांना ते बोलत होते.

महापालिका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी ऑनलाईन आरक्षण

शॉन क्लार्क यांच्यसह संशोधन समन्वयक श्वेता क्लार्क या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या होत्या. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक डॉ. जयंत आठवले या शोधनिबंधाचे लेखक, तर संशोधन गटातील शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) या उपकरणांद्वारे संशोधन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.