केंद्रीय संस्कृत विद्यापीठ के. जे. सोमय्या संकुलाला ‘नॅक’चा ए- प्लस दर्जा

मुंबई, दि. २४
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ के. जे. सोमय्या संकुलाला ‘नॅक’चा ए- प्लस दर्जा मिळाला आहे.
के. जे. सोमय्या कॅम्पस, मुंबईचे संचालक प्रा. लक्ष्मी निवास पांडे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नॅक’ समितीसमोर सादरीकरण केले.

या विद्यापीठात संस्कृतच्या धर्मग्रंथांबरोबरच आधुनिक विषयांचाही अभ्यास आणि अध्यापन केले जाते, या विद्यापीठात प्रकाशशास्त्री प्रथम वर्ष (इयत्ता 11वी) ते विद्यावारी (पीएच.डी.) साहित्य, व्याकरण, ज्योतिष, धर्मशास्त्र, वेदांत, अध्यापनशास्त्र (बी.एड.) बौद्ध, पाली, प्रकृती राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, अंकगणित इत्यादी विषयांचा अभ्यास केला जातो.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, सामाजिक विज्ञान, योग, इंग्रजी, हिंदी, मातृभाषा असे अनेक विषय शिकविले जातात.
विद्यापीठातील पदवीधारक विज्ञान आणि वाणिज्य विषयाशी संबंधित कोणत्याही स्पर्धा परीक्षेत बसून आपले स्थान मिळवू शकतात. अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.