एक रात्र कवितेची….. काव्यरसिक मंडळाचा अनोखा उपक्रम
डोंबिवली दि.२० :- काव्यरसिक मंडळ आयोजित ‘एक रात्र कवितेची’ हा कार्यक्रम रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. रात्री साडेनऊ ते सकाळी सातपर्यंत कवितांची मैफल रंगली होती. वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या तऱ्हेच्या कविता गजला सादर केल्या गेल्या.एक एक कविता वेगळी त्याचा आशय विषय आणि मांडणी वेगळी, आनंद, दुःख भीती, खेद, हलकेफुलके प्रेम, विरह अशा वेगवेगळ्या स्तरावरती भावनांचा चढ-उतार रसिकांनी अनुभवला.
मुंबई ते पुणे महामार्गावर ई शिवनेरी बस धावणार – येत्या १ मे पासून सुरूवात,
ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर, छाया कोरगावकर, सुनंदा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सत्रे पार पडली. या तीनही सत्रांच्या अध्यक्षांसह अन्य सहभागी कवी, कवयित्रींनी कविता, गझल सादर केल्या. आप्पा ठाकूर यांनी सादर केलेल्या गझलने कवितेच्या रात्रीला सुरुवात झाली तर सुनंदा कांबळे यांनी सादर केलेल्या कवितेने कवितेच्या रात्रीची सांगता झाली. काव्यरसिक मंडळाच्या अध्यक्ष वैदेही जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.