राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी चळवळ सुरु करावी- राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.२६ :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण चळवळ सुरु करावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड येथे सहस्त्र जलकलश घेऊन जाणा-या रथयात्रेस राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथून सुरवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठक – नाना पटोले
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील पवार व बाळंभट व भिकमभट यांचे १७ वे वंशज महंत सुधीरदास महाराज यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.
‘भाजप’कडून सापत्न वागणूक – खासदार गजानन किर्तीकर
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. महाराज द्रष्टे होते. ईस्ट इंडिया कंपनीचे मनसुबे तसेच औरंगझेबाकडून होणारे संभाव्य धोके त्यांनी पूर्वीच ओळखले व आरमाराची निर्मिती केली, असे राज्यपालांनी सांगितले. रायगड येथे दिनांक २ जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नद्यांचे पवित्र जल वापरले जाणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. लहान मुले व युवकांनी यावेळी मैदानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर केली.