व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे पतीने तिच्या पत्नीला दिला तिहेरी तलाक

उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यातील हयातनगर येथे एका पतीने तिच्या पत्नीला व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे तिहेरी तलाक दिला असून पत्नीने पति व सासरच्यांनीही हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. हयातनगर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, उम्माम नाज यांनी सांगितले आहे की तिने २०१६ मध्ये अलिगडच्या रफी सिद्दीकी शी लग्न केले होते आणि काही काळ त्याच्याबरोबर दुबईमध्ये ही राहिली होती.

हेही वाचा :- डोंबिवलीत शिवसैनिकांसह राष्ट्रवादी-काँग्रेसचा जल्लोष

 हयातनगर पोलिस निरीक्षक एसएचओ रवींद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आरोप केला आहे की तिचा नवरा आणि सासरचे लोक हुंड्यामध्ये कार आणि रोखरक्कम मागत होते आणि २२ नोव्हेंबरला दुबईहुन त्या महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवरुन एक मेसेज आला होता. ज्यामध्ये तिला तिच्या पतीने घटस्फोट दिला असे म्हटले होते. गुरुवारी एफआयआर नोंदविण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email