कल्याण ; पोलीस स्थानकासमोरच चोरट्यांचा धुमाकूळ
कल्याण दि.०५ – कल्याण पूर्वेत चोरट्यानी उच्छाद मांडला असून अपरात्री पहाटेच्या सुमारास दिवसा ढवळ्या पादचाऱ्याचे मोबाईल, दागिने, रोकड हिसकावून पळ काढण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या चोरट्या पुढे पोलीस यंत्रणा ही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच चक्क पोलीस स्थानकासमोरून एका पादचारी तरुणाचा मोबाईल धूम स्टाईल चोरटयांनी लंपास करत चक्क पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
हेही वाचा :- डोंबिवली ; विद्यार्थ्यांला ४० हजारांना लुबाडले
कल्याण पूर्व विठ्ठलवाडी राय हेरिटेज मध्ये राहणारे रमेश कुमार इंद्रमनी काल सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुना लिंक रोड ने पायी चालत जात असताना कोलशेवाडी पोलिस स्थानकाणजिक पोहचताच पाठीमागून भरधाव वेगाने एका दुचाकीवरून दोघेजण आले त्यांनी इंद्रमनि यांच्या हातातील मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली या प्रकरणी इंद्रमनी याने कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.