डोंबिवली ; पालिकेच्या सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला

डोंबिवली दि.०४ – कल्याण पूर्व पिसवली हनुमान मंदिराजवळ राहणारे मयूर मसणे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सफाई कामगार आहेत. काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मयूर याच परिसरात राहणाऱ्या मनीष पाटील यांच्या घारासामोरून जात असताना मनीष पाटील ,संतोष पाटील ,प्रीतम पाटील ,चेतन तवटे ,साहिल मराठे यांच्या सह इतर १ ते २ जणांनी त्यांना हटकले व मनीष पाटील याने मयूर वर चोपर ने मयूरच्या पोटावर व हातावर डोक्यावर वार करत प्राणघातक हल्ला केला.

हेही वाचा :- डोंबिवली ; गॅस एजन्सीमध्येच घरगुती सिलेंडरमधून गॅसची चोरी

तर इतर साथीदारांनी ठोशा बुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तर या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी मनीष पाटील,संतोष पाटील ,प्रीतम पाटील,चेतन तवटे ,साहिल मराठे यांच्या सह इतर १ ते २ जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email