‘बाई पण भारी देवा’ चित्रपटातील कलाकारांशी गप्पा
डोंबिवली दि.१० :- चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘मुक्त संध्या’ या कार्यक्रमात येत्या १३ ऑगस्ट रोजी ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटातील कलाकारांसोबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर त्यांची मुलाखत घेणार आहेत.
‘म्हाडा’ मुंबईच्या घरांसाठी येत्या सोमवारी सोडत
या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते निखिल साने, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि वंदना गुप्ते हे कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता सुयोग मंगल कार्यालय टिळक नगर, डोंबिवली पूर्व येथे होणार असून कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.