आमदार मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई दि.१६ :- शिवसंग्रामचे प्रमुख दिवंगत विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने मेटे यांचा वाहन चालक एकनाथ कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत असताना पहाटे पाचच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता.

मेटे यांची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील ‘सीसीटीव्ही’ चित्रिकरण तपासण्यात आले. यातून चालकाने ताशी १३०-१४० किलोमीटर वेगाने गाडी चालविल्याचे तसेच गाडीचा अपघात होण्याआधी चालक कदम याने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.