जेष्ठ नागरिकांच्या मूक आंदोलनासह राबवली सह्यांची मोहीम
Hits: 0
कल्याण दि.०९ :- डोंबिवली स्टेशन परिसरात गुरुवारी जवळपास दीडशे जेष्ठ नागरिकांनी विविध मागण्यांसाठी एकत्र येऊन मूक आंदोलन छेडले. या आंदोलनकर्त्यांनी त्याच ठिकाणी सह्यांची मोहीम राबवली. अॉ ल इंडिया रिटायर्ड्स फेडरेशन या संस्थेतर्फे हे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी प्रवाशांना माहिती देत सह्यांची मोहीम राबविली होती.
हेही वाचा :- भगव्या दौडमध्ये खड्ड्यांचे अडथळे सत्ताधारी पक्षाच्या शाखाप्रमुखाची तक्रार दाखल
मेडिक्लेम इन्शुरन्स प्रीमियम वाढवून देणे, फिक्सड डिपॉझिट्सचा रेट वाढवून देणे आणि इन्शुरन्स प्रीमियमवर जो१८ टक्के जीएसटी शून्य टक्के करावा या मागण्या मांडण्यात आल्या. सदर मागण्यांच्या पाठींब्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सह्यांची मोहीम राबवली.
या मोहिमेला तरूणांपासून जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास एक लाख सह्या जमा करून आपली मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.