वातानुकूलित आणि मोनो, मेट्रोला सामानाचा डबा जोडण्याची मागणी
मुंबई दि.२३ :- मुंबईतील उपनगरी वातानुकूलित लोकल तसेच मोनो, मेट्रो उपनगरी गाडीला सामानाचा डबा जोडण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशने मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केली आहे.
चतुरंग प्रतिष्ठानच्या चैत्रपालवी संगीतोत्सवात संगीत सन्मान, संगीत शिष्यवृत्ती प्रदान
वातानुकूलित लोकल, मोनो आणि मेट्रोला सामानाचा डबा नसल्याने डबेवाले, फेरीवाले, अवजड सामग्री घेऊन जाणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मोनो, मेट्रोला पुढे आणि मागे सामान डबा जोडावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.