शिवडी-न्हावाशेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पातील मार्गावर ८ पथकर नाके
मुंबई दि.०४ :- मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पातील मार्गिकेवर आठ पथकर नाके असणार आहेत. हे पथकर नाके उभे करण्याचे नियोजन ‘एमएमआरडीए’ने सुरू केले आहे. हा मार्ग २१ किलोमीटर लांबीचा असून यातील १८ किलोमीटर मार्ग समुद्रावर आहे. हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन चिर्ले येथे संपणार आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता – शरद पवार
यामुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर जेमतेम ४० मिनिटांवर येणार आहे. या मार्गाचे बांधकाम ३१ मार्चपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते व ऑगस्टपर्यंत त्यावरील विविध सुविधा पूर्ण होणार होत्या. मात्र बांधकाम कालावधी सुमारे दोन महिन्यांनी लांबला आहे.
इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
तसे असले तरी जूनपूर्वी सुविधा उभारणी सुरू व्हावी, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. सर्व पथकर नाके अत्याधुनिक फास्टॅग व ईटीसी तंत्रज्ञानावर आधारित असून निविदेची अंतिम तारीख २२ मे आहे.