* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> देशभरात 7 मार्च 2019 ‘जनऔषधी दिवस’ म्हणून साजरा करणार – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

देशभरात 7 मार्च 2019 ‘जनऔषधी दिवस’ म्हणून साजरा करणार

नवी दिल्ली, दि.०६ – सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या माध्यमातून परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, असे केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

हेही वाचा :- राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँकेत 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार

जेनेरिक औषधांविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या औषधांच्या वापराला चालना देण्यासाठी 7 मार्च 2019 हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. 7 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जनऔषधी केंद्रांचे मालक आणि या योजनेच्या लाभार्थींशी दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत, अशी माहिती मांडवीया यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *