ऋतुराज गायकवाडचे एका षटकात ७ षटकार

विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यातील थरार

वृत्तसंस्था

अहमदाबाद दि.२८ :- विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील दुस-या सामन्यात महाराष्ट्र संघाच्या ऋतुराज गायकवाडने आपल्या चमकदार खेळीने इतिहास घडविला. ऋतुराजने शिवा सिंगच्या एका षटकात सलग सात षटकार ठोकले.

डावाच्या ४९ व्या षटकात शिवा सिंग गोलंदाजी करत होता. या षटकात ऋतुराजने सात षटकार मारले. गायकवाडने पहिल्या चार चेंडूत चार षटकार ठोकले. षटकातील पाचवा चेंडू नो-बॉल होता त्यावर गायकवाडने षटकार मारला. यानंतर मिळालेल्या फ्री हिटवर त्याने सहावा षटकार मारला. षटकातील शेवटचा चेंडूही गायकवाडने षटकार मारून सीमापार नेला. शिवाने त्याच्या या षटकात ४३ धावा दिल्या.

५० षटकांच्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तरप्रदेश विरुद्ध खेळताना ऋतुराजने दुहेरी शतकही झळकावले. महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराजच्या या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने ५० षटकांत ५ बाद ३३० धावा केल्या. ऋतुराजने १५९ चेंडूत १६ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने २२० धावांची खेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.