7 फूट लांबीच्या धामणीचा वाचवला जीव

धामण अडकली होती जाळयात

डोंबिवली – प्लांट अँड  अनिमल्स वेल्फेअर सोसायटी च्या सदस्यांनी आज एका जाळीत अडकलेल्या धामण जातीच्या सापाची अथक प्रयत्नती सुटका केली.
संस्थेचा हेल्पलाईन  वर आज एक कॉल आला की एक साप लोढा हेरिटेज कंपाऊंड मध्ये क्रिकेट बॉल प्रॅक्टिस साठी बनवलेल्या जाळ्यात अडकली आहे. निलेश आणि पोझ च्या स्वयंसेवकांनी लगेच पोहचून, संपूर्ण जाळी कापून काढून लगेच धामणीची सुटका केली. सुमारे अर्धा तास प्रयत्न करून सर्व जाळी कापून 7 फूट लांबी असलेल्या धामणीची सुटका केली. नायलॉन च्या जाळी मूळे सापाला जखमा झाल्या होत्या, त्यावर प्रथमोपचार करून तिला त्याच एरिया मष्ये सोडले गेले. मानवाच्या अधिवासामूळे वन्य पशु पक्ष्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे  चे संस्थापक श्री निलेश भणगे ह्यांनी सांगितले. मच्छी मारच्या जाळ्यात बरेचदा सर्प आणि बदक फसलेले आढळून येतात. महिला वेणी बांधताना बरेचदा केसांचा पुंजका रस्त्यावर किंवा बाहेर फेकून देतात. त्यात बरेच कबुतरे अडकून संस्थे कडे उपचाराला येतात. रस्त्यावरच्या प्राण्यांना पण असें मनुष्यमुळे त्रास होत असतो. रिकामे प्लास्टिक डबे फेकून दिल्यामुळे बरेचदा कुत्रे किंवा मांजरे ह्यांचे तोंड त्या बरणीत अडकलेले असते, मग पोझ  च्या मेंबर्सना मदतीला बोलवले जाते. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email