मुंबई आसपासच्या इंग्रजी वेब पोर्टलची सुरुवात
मुंबई आसपासच्या इंग्रजी वेब पोर्टलची सुरुवात
मुंबई – अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या मुंबई आसपासने आता इंग्रजी वेब पोर्टलची सुरुवात केली आहे.आज दिनांक १६ मार्चपासून मुंबई आसपास या इंग्रजी वेब पोर्टलचा शुभारंभ झालाय.
यापूर्वी राष्ट्रभाषेतून मुंबई आसपासची २८ ऑगस्ट २०१७ रोजी सुरुवात झाली.सर्व वाचकांनी भरभरून दिलेल्या दिलेया प्रतिसादामुळे नंतर अल्पावधीतच म्हणजेच २९ सपटेंबर २०१७ पासून हिंदी भाषिकांसाठी बिहार की आवाज या वेब पोर्टलची सुरुवात करण्यात आली.त्यालाही वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील मराठी वाचकांसाठी आसपासने मराठी वेब पोर्टलची सुरुवात केली.या उपक्रमाला तर वाचकांनी फारच उस्फुर्त प्रतिसाद दिला.आणि अल्पावधीतच मुंबई आसपास मराठी हे वेब पोर्टल लोकप्रीय ठरले.
वाचाकाना अधिक सेवा देण्यासाठी मुंबई आसपासने मुंबई आसपास मराठी या वेब पोर्टलनंतर ११ नोव्हेंबर पासून राष्ट्रभाषेतून मुंबई आसपास यूट्यूब चॅनलचीही सुरुवात केली.ते सद्ध्या प्रायोगिक तत्वावर चालु असून लवकरच ते पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
मुंबई आसपासने इंग्रजी वेब पोर्टलची सुरुवात जरी आजपासून केली असली तरी गुडी पाडव्यापर्यंत ते प्रायोगिक तत्वावर चालणार असून गुडी पाडव्यापासून ते पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.अशी माहिती मुंबई आसपासचे संस्थापक राजेश सिन्हा यांनी उद्घाटन प्रसंगी दिली.लवकरच गुजराथी भाषीकांसाठी मुंबई आसपास वेब पोर्टल सुरु करणार असून भारतातील सर्वच भाषांमधून हे वेब पोर्टल सुरु करायचं आपलं स्वप्न असल्याचही त्यांनी सांगितलं.यावेळी सर्व वाचकांचेही त्यांनी मुंबई आसपास परिवारातर्फे आभार मानले.
डावीकडून करण हिन्दुस्तानी,अॅड.महेश शर्मा,आणि मुंबई आसपासचे संस्थापक राजेश सिन्हा
http://marathi.mumbaiaaspaas.com