आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ६ सह-सरकार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत एक नवा निर्णय घेण्यात आला आहे.या नव्या निर्णयानुसार आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ६ सह-सरकार्यवाह असतील.यापूर्वी संघात ३ सह-सरकार्यवाह असायचे.आता सुरेश सोनी,डॉ.कृष्णा गोपाल,दतात्रेय होसबले,व्ही.भगैय्या,डॉ.मनोहर वैद्य,के.मुकुंद हे सह-सरकार्यवाह आहेत.रा स्व संघ अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सदर निर्णय घेण्यात आला.डॉ.मनोहर वैद्य व के.मुकुंद हे नवे सह-सरकार्यवाह होत असून डॉ.वैद्य यांच्या जागी अरुण कुमार अखिल भारतीय प्रचार प्रमुख असतील.तर अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख सुनीलभाई मेहता,अखिल भारतीय समरसता गतिविधि सहप्रमुख रवींद्र किरकोळे,पश्चिम क्षेत्र प्रचारक अतुल लिमये,पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी,पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट,प. महाराष्ट्र प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे,राजकीय क्षेत्र विजयराव पुराणिक हे असतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email