60 हजार महिला फेसबुकच्या साहय्याने डिजिटल साक्षर

नवी दिल्ली दि.१२ – राष्ट्रीय महिला आयोगाने फेसबुक आणि झारखंडमधल्या रांची येथील सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्याने महाविद्यालय/विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता उपक्रम सुरु केला आहे. महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता, त्यांची हाताळणी व ते रोखणे याबाबत जागरुकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. देशातल्या महत्वाच्या शहरांमधल्या विद्यापीठातल्या 60 हजार महिलांना इंटरनेट, सोशल मिडिया आणि ई-मेलच्या सुरक्षित वापराबाबत याअंतर्गत माहिती देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email