एस.टी.च्या तिकीट दरातील सवलतीमुळे दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाखांनी वाढ
बस तिकीटदरात महिलांना ५० टक्के सवलत
मुंबई दि.१८ :- ‘महिला सन्मान योजने’मुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाख प्रवाशांची वाढ झाली आहे. सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापूर विभागातून मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द
योजनेमुळे एसटीला ४ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
१७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्याची योजना सुरू करण्यात आली. पहिल्या दिवसापासून योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर विभागात एक महिन्यात ३० लाख २४ हजार महिलांनी प्रवास केला.