मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
मुंबई – मंत्रालयाच्या इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून वरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केली आहे.आज संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली.
आज संध्याकाळी ५ च्या सुमारास मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून हर्षल सुरेश रावते या तरूणाने उडी मारली त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.त्याने आत्महत्या का केली याबाबत अजून नेमकी माहिती मिळालेली नाही.तो पैठणचा रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच त्याच्याकडून चेंबूर ते सीएसएमटी हे लोकलचे तिकीट सापडलं आहे. हर्षलच्या खिशामध्ये एक चिठ्ठीही सापडली आहे.
Please follow and like us: