स्वातंत्र्य सेनानी सिधुताई भुस्कुटे याचे निधन
हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी सिधुताई भुस्कुटे याचे आज सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले त्या 87 वर्षांच्या होत्या
डोंबिवली नगरपालिके मध्ये त्या नगरसेविका म्हुणुन निवडून आल्या होत्या. बालकल्याण आणि मातृ-महिला मंडळ या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. त्यांना जे निव्रुती वेतन मिळत होते ते शाळेतील गरीब महिला-मुले यांच्यासाठी खर्ची करत. मुख्य म्हणजे काही दिवसापूर्वीच त्यांनी चिपळूण येथील गरीब महिलांना उबदार ब्लँकेटचे वाटप करून प्राणायामाचे धडे दिले होते. संपूर्ण बालपण स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि मध्यम वय समाज सेवेसाठी खर्ची करून उतार वयातही त्याचे सामाजिक बांधिलकीचे काम सुरु होते. सिंधुताई मूळच्या औरंगाबाद येथील असल्या तरी यांची कर्मभूमी मात्र डोंबिवली होती. त्यांनी महागाई विरोधी रणसिंग फुंकले होते. परंतु गेली तीन वर्षे त्या चिपळूण येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पश्च्यात दोन मुली, चार मुलगे, नातवंड असा मोठा परिवार आहे.
Please follow and like us: