५० हजारासाठी पत्नीचा छळ; मुलांवरही ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न
(म.विजय)
आष्टी – घर बांधण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा सातत्याने छळ करून पोटच्या मुलांनाही संपविण्याच्या धमक्या देणाऱ्या बापासहीत चौघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एवढेच नव्हे तर या बापाने स्वतःच्या मुलांवर ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोपही पत्नीने केला आहे.
याप्रकरणी सोनाली उद्देवाल यांच्या फिर्यादीवरून पती हिरालाल, सासू पार्वती, नणंद रेखा बाबू लव्हारे आणि नंदावा बाबू प्रभू लव्हारे या चौघांवर अंभोरा पोलिसात कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
Please follow and like us: