मुंबईच्या निवासी परिसरात चार्टर्ड विमान अपघातात 5 जण ठार

मुंबई – मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी चार्टर्ड विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. हे विमान ३० प्रवासी क्षमताच होत हे चार्टर्ड विमान जुहू हेलिपॅडहून टेस्टिंगसाठी निघालं होतं. या दुर्घटनेत एक पायलट, विमानातील इतर तीन व्यक्ती आणि एक पादचारी असे पाच जण मृत्युमुखी पडल्याचं पोलिसांकडून सागंण्यात येत आहे. मृतांमध्ये मारिया नावाच्या महिला पायलटचाही समावेश आहे. पायलट – मारिया, को-पायलट – प्रदीप राजपूत, विमान तंत्रज्ञ – सुरभी यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं समजतंय. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ हाती पडल्यानंतर हा अपघात नेमका का झाला? याबद्दल अधिक माहिती समजू शकेल.

या घटनेत मोठी जिवितहानी थोडक्यात टळलीय. घाटकोपरमधल्या भटवाडी या रहिवासी भागात हे विमान कोसळलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, पायलटच्या सतर्कतेमुळे हे विमान मैदानी भागात कोसळलं. घाटकोपरमध्ये जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम चालू असताना चार्टर्ड विमान कोसळलं. या मैदानाच्या बाजुलाच एक महाविद्यालयही आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. तर दोघांना अत्यवस्थ अवस्थेत राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलंय.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email