नवी दिल्ली येथे 21-23 फेब्रुवारी 2019 दरम्यान चौथी भारत-आसियान परिषद आणि प्रदर्शन
नवी दिल्ली, दि.२० – नवी दिल्ली येथे 21-23 फेब्रुवारी दरम्यान चौथ्या भारत-आसियान परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाणिज्य विभागाने फिक्कीच्या साहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वाणिज्य आणि उद्योग तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि आसियान देशांचे व्यापार मंत्री आसियान सरचिटणीसांसह संयुक्तरित्या या परिषदेचे आणि प्रदर्शनाचे 21 फेब्रुवारीला उद्घाटन करतील.
हेही वाचा :- “ऊर्जा आणि पर्यावरण: आव्हान आणि संधी” आंतरराष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
आसियान अर्थात दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या गटामध्ये व्हिएतनाम, थायलंड, सिंगापूर, फिलिपाइन्स, म्यानमार, मलेशिया, लाओ पीडिआर, इंडोनेशिया, कंबोडिया आणि ब्रुनेई या देशांचा समावेश आहे. आसियान देश भारताचे चीनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व्यापारी भागीदार असून द्विपक्षीय व्यापार 81.33 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. भारत आणि आसियान यांच्या प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी धोरणकर्ते आणि उद्योजक यांना मंच या परिषदेमुळे उपलब्ध होईल. प्रदर्शनामध्ये 200हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमादरम्यान खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातही बैठका होतील.