कल्याणात पत्रकाराची बॅग लांबवली,एक लाख रोकड सह कॅमेरा व इतर साहित्य लंपास
डोंबिवली : ( प्रतिनिधी )
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात भामट्यानि एकच हैदोस घातला असून पाळत ठेवून नागरिकांचे वाहनचालकांचे या न त्या कारणाने लक्ष विचलित करत त्यांच्या जवळील रोकड ऐवज लंपास करण्याच्या घटना मध्ये वाढ होवू लागली आहे .या वाढत्या घटनामुले नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस यंत्रणा चक्रावल्या असून पोलीस या भामट्याना गजाआड करण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत .कल्याण मध्ये एका पत्रकाराचे लक्ष विचलित करत एका भामट्याने त्याच्या गाडीत ठेवलेली रोकड कमेरा बग सह इतर साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे
काळ सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पत्रकार संदेश शिर्के आपल्या चारचाकी गाडी स्टेशन परिसरात उभी करुन सीम कार्ड घेण्यासाठी नजीक च्या दुकानात गेले .सीम कार्ड घेवून पुन्हा गाडीत बसले असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीची काच वाजवून खाली काही तरी पडले आहे असे सांगितले गाडीतून दिसत नसल्याने शिर्के गाडी तून खाली उतरले व खाली पाहू लागले असताना त्यांना कपैसे पडल्याचे दिसले ते पैसे उचलत असल्याची संधी साधत या भामट्याने क्षणार्धात गाडीचा मागचा दरवाजा उघडून त्याच्या कमेराची बग घेवून तेथून पळ काढला .पुन्हा गाडीत बसून पाठीमागे लक्ष गेले असताना त्यांना बग दिसली नाही तेव्हा तेव्हा त्यांना बग चोरी झाल्याचे लक्षात आले .या बगेत कमेरा इतर साहित्यासह एक लाखांची रोकड होती .याबाबत शिर्के यांनी महत्मा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलीसानि अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.