खासदार कपिल पाटील यांच्याकडून चार नव्या रेल्वे स्थानकांची मागणी

खासदार कपिल पाटील यांच्याकडून चार नव्या रेल्वे स्थानकांची मागणी

      रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची घेतली भेट

    डोंबिवली  

मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा आणि कर्जत पट्ट्याचा वाढता विकास लक्षात घेऊन हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी चार नवी रेल्वे स्थानके उभारण्याची मागणीभिवंडी लोकसभा मतदार संघाचे  खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. टिटवाळा ते खडवली स्थानकांदरम्यान गुरवलीअंबरनाथ ते बदलापूर दरम्यान चिखलोलीआसनगाव ते आटगावदरम्यान सावरोली आणि बदलापूर ते वांगणी दरम्यान चामटोली रेल्वे स्थानके उभारण्याबाबत खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिले. नव्या रेल्वे स्थानकांबरोबरच टिटवाळा ते मुरबाड रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणीही खासदार पाटील यांनी केली आहे.

    गुरवली रेल्वे स्थानक सुरू झाल्यास सुमारे २०  ते २५ गावातील प्रवाशांचा फायदा होईल. चिखलोली रेल्वे स्थानकांमुळे हजारो प्रवाशांची अंबरनाथ व बदलापूर स्थानकाकडे होणारी पायपीट टळेलसावरोली रेल्वे स्थानकामुळे प्रसिद्ध मानस मंदिराबरोबर हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांची सोय होईल. वांगणी ते बदलापूर दरम्यानच्या 11 किलोमीटरमध्ये एकही स्थानक नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या प्रवाशांसाठी चामटोली येथे स्थानक उभारल्यास हजारो प्रवाशांची सोय होईलयाकडे खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.टिटवाळा ते मुरबाड नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असूनएमआरव्हीसीकडून सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार केला जात आहे. त्यामुळे या मार्गासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करावीअशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे. या रेल्वेमार्गामुळे मुरबाडसह नगरकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान उंबरमाळी व तानशेत येथे लोकल थांबत आहेत. मात्रया ठिकाणी रेल्वे स्टेशनला अधिकृत दर्जा नसल्यामुळे प्रवाशांना नाहक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या स्थानकांना अधिकृत दर्जा द्यावाअशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

————————————–

होम प्लॅटफॉर्मच्या कामाला  वेग देण्याची मागणी

    बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्रया कामाची निविदा प्रक्रिया संथपणे सुरू आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करावीअशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली.

 

     फोटोओळ  – भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणींबरोबरच चार नवी रेल्वे स्थानके सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना निवेदन देताना भाजपचे खासदार कपिल पाटील

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email