राज्यातील दुकानं आता सातही दिवस सुरू राहणार

राज्यातील दुकानं आता सातही दिवस सुरू राहणार : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017  लागू

राज्यातील दुकानं सात दिवस सुरू राहणार : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017  लागू

नागपूर : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवसाय 24 तास कार्यरत असतात त्यामुळे ऑफलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्याशी सकारत्मक स्पर्धा करता यावी म्हणून नवीन अधिनियमामध्ये दुकाने व आस्थापनांना आठवडयातील 7 दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.  मात्र तेथील कामगारांना आठवडयातून 1 दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 हा अधिनियम मंगळवारी राज्यात लागू करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व मोठया व्यवसायाना / आस्थापनांना हा अधिनियम लागू झाला आहे.  त्यामुळे शहरी भागासह ग्रामिण भागातील अनेक माहिती व तंत्रज्ञान (आयटी ) व इतर आस्थापनांना हा अधिनियम लागू होत असल्याने तेथील कामगारांना या अधिनियमाच्या तरतूदीचा लाभ होणार आहे.  या अधिनिमाअंतर्गत 10 पेक्षा कमी कामगार आहेत अशा व लघु व छोटया आस्थापनांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही त्याऐवजी त्यांनी व्यवसाय सुरु केल्याबाबत ऑनलाईन सूचना दयावयाची आहे व त्या अर्जाची पोहोच पावती ऑनलाईन उपलब्ध होईल.  त्यामुळे कामगार नसलेल्या सुमारे 22 लाख आस्थापना मालकांना यातून सुट मिळणार आहे.  तसेच सुमारे 12 लाख आस्थापना ज्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार आहेत त्यांना या अधिनियमाच्या आस्थापना उघडणे व बंद करण्याच्या व इतर तरतुदीतून सुट मिळाली असल्यामुळे व्यवसाय करण्यास व त्यात वाढ होण्यास पुरक वातावरण निर्माण होईल.  तेथे अधिक कामगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.  तसेच या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सुमारे 35 लाख कामगारांना किमान वेतन तसेच आद्योगिक विवाद अधिनियमाच्या तरतूदी लागू राहतील. नव्या कायद्यामुळे रोजगार निर्मितीस वाव मिळेल अशी आशा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी  व्यक्त केलीय.

अधिनियमाचे उल्लंघन केल्यास एक लाखाच्या दंडाची शिक्षा

या अधिनिमाअंतर्गत कामगार हिताच्या दुष्टीने  अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. ओळखपत्र देणे, प्रसाधन गृह, पाळणाघर, उपहारगृह या सोयी पुरविणे मालकांवर बंधनकारक केले आहे.  तसेच राज्यातील दुकाने व आस्थापनेतील कामगारांना नैमित्तीक रजेची सवलत प्रथमत:च मिळाली आहे.  या अधिनियमांतर्गत 8 नैमित्तिक रजा देणे बंधनकारक आहे.  या अधिनियमातील तरतूदींचे उल्लंघन केल्यास रुपये एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा आहे.

महिलांना त्यांच्या संमतीने रात्री 9.30 नतंर काम करण्याची मुभा

या अधिनियामांतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्याच्या घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत सुरक्षित वाहन व्यवस्था, कामाच्या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान, प्रतिष्ठा व सुरक्षितता बाबत पुरेशा स्वरंक्षण असेल अशा ठिकाणी महिलांना त्यांच्या संमतीने रात्री 9.30 नतंर काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.   यामुळे महिलांचे सशक्तीकरण व सबलीकरण होण्यास मदत होणार असल्याचे कामगारमंत्रयानी स्पष्ट केलय.  या अधिनियमांतर्गत आस्थापना तीन पाळयामध्ये व्यवसायाकरीता सुरु असण्याची मुभा असली तरी ज्या आस्थापनेत मद्य विक्री किंवा मद्य पुरविले जाते अशा आस्थापनांकरीता व त्या व्यतिरिक्त  जनतेच्या हिताच्या दृष्टीने  कोणत्याही आस्थापनेमध्ये किंवा क्षेत्रामध्ये आस्थापना उघडणे व बंद करण्याच्या वेळेचे नियंत्रण करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email