४० वी राष्ट्रीय मास्टर्स अॉथलेटीक्स चांम्पीयन शीप संपन्न

उरण दि.१७ :- १०- १४ जानेवारी २०२० दरम्यान ४० वी राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटीक्स चांम्पीयन शीप ही स्पर्धा ऑलंपीयन रहमान स्टेडिअम कोझीहोडे, कॅलिकत केरळ येथील क्रिडा संकुलात संपन्न झाली आहे या स्पर्धेत ३५ राज्यातील सुमारे ३८६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत जिल्हा परिषद रायगड च्या आरोग्य विभागात मोडना-या पनवेल पंचायत समिती येथील आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले उरणचे सुपुत्र संतोष परदेशी यांनी गोळा फेक व थाळीफेक मध्ये कास्यंपदक मिळविले आहे.

हेही वाचा :- सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? आदित्य ठाकरे म्हणतात…

परदेशी यांनी रायगड जिल्हा परिषद अलिबाग चे नाव क्रीडा क्षेत्रात जिल्हा ,राज्य, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सातासमुद्रा पलीकडे उज्ज्वल केले आहे. परदेशी यांच्या उत्तम कामगीरी बदल रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कडुन २०१५ मधे “रायगड भुषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात रायगड जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे. की त्यांचा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असून जिल्हा परिषद चे नाव उज्ज्वल करित आहे.

हेही वाचा :- मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत कल्याणच्या डॉ. अस्मिता कुकडे ठरल्या एक्सलंट ऑरेटोर

ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया व श्रीलंका असे यशस्वी दौरे पुर्ण करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर ७ सुवर्ण ,८ रोप्य ,१ कास्य पदक मिळवीले आहे. तर उत्तम सराव करून २०२१ मध्ये जपान येथे होणा-या १० व्या जागतीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संतोष परदेशी सराव करीत आहेत.परिस्थितीशी दोन हात करत, आर्थिक समस्यांना तोड़ देत संतोष परदेशी यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.