40 वर्षीय महिलेची हत्या करणा-याला अटक

मुंबई – मुंबईच्या दादर परिसरातील एका 40 वर्षीय महिलेची हत्या करणा-या  प्रियकराला अटक करण्यात गोवंडी शिवाजी नगर पोलिसांना  12 दिवसा नंतर यश मिळालंं. सदर प्रियकराने  हत्या केल्या नंतरही 4 दिवसा पर्यंत तो मृतदेह त्याच्या जवळच होता.त्यांने आपल्या प्रेमिकाची हत्या का केली हे अजून उघडीस आलं नाही. 11 रोजीच्या दुपारी गोवंडी नटवर पारेख कंपाउंड मध्ये एका ड्रममध्ये जवळ 40 वर्षीय अज्ञात महिलाचा मृतदेह सापडला होता.तपासामध्ये निष्पन्न झाले की तो ड्रम एका टेम्पोने नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मधून मुंबईत आणला होता. तिथुन माहिती घेतल्यावर पोलिसांना समजले की तो ड्रम नवी मुंबईच्या नेरुळ येथील गावावरून  एपीएमसी मार्केट मध्ये आणला गेला होता.सदर ड्रम बाबू भगवान पटेल (60) नावाची एक व्यक्ती घेऊन आली आणि आधी एपीएमसी मार्केट  आणि नंतर तिथून गोवंडी शिवाजी नगर येथे आला.पोलिसांनी  इस्टेट एजेन्टचे काम करणा-या  बाबू पटेलला जेव्हा अटक केली तेव्हा सर्व सत्य समोर आलं.आरोपीनी दिलेल्या माहिती नुसार मृतकचे नाव मीना आहे. ती दादर परिसरात देह व्यापार  करत होती. आरोपीने घटनेच्या दिवशी मीनाला आपल्या घरी बोलवलंं. जिथे बाबू पटेल आणि त्याच्या पत्नीने मिळून मीनाची हत्या केली. आणि मृतदेहाला चार दिवसा पर्यंत आपल्या घरात ठेवलं . त्यानंतर मृतदेहाला ठिकाणी लावण्यासाठी ड्रम आणला ज्या मध्ये मीनाचा मृतदेह ठेवून गोवंडीला घेऊन गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचा तपासही सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email