माऊंट मेरी जत्रेनिमित्त ‘बेस्ट’तर्फे २८७ अतिरिक्त बसगाड्या
मुंबई दि.०८ :- वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी जत्रा येत्या १० सप्टेंबरपासून सुरू होत असून ही जत्रा १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या जत्रेला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमाने वांद्रे स्थानक (प,) ते हिल रोडदरम्यान २८७ अतिरिक्त बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
जत्रा कालावधीत सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त बसगाड्या वांद्रे रेल्वे स्थानक (प.) आणि हिल रोड उद्यानदरम्यान धावणार आहेत. जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प.) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.