२०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू….दानवे
२०१९ च्या निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात विस्तारक पाठविले आहे. तसेच राज्यात असलेल्या ९१ हजार मतदान केंद्रापर्यंत कार्यकर्ते पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ७० टक्के बूथ स्थापन करण्यात आले आहे. पुढच्या दोन महिन्यांत ३० टक्के बूथ तयार केले जातील. एका विधानसभा मतदारसंघात ३०० बूथ राहणार असून एका बूथवर २५ त्यामुळे साडेसात हजार कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात काम करणार आहे. या बूथप्रमुखांचे १ डिसेंबरपासून प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. बूथच्या प्रमुखांना संवाद साधण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. १ बूथ २५ युथ याप्रमाणे ही योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ९१ हजार बूथपर्यंत आमचा जाण्याचा संकल्प असल्याचे दानवे म्हणाले.
Please follow and like us: