पुन:प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून आता ठाण्यातील रस्ते धुतले जाणार

(श्रीराम कांदु )

महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून शहरातील रस्त्यांवरील धुळीला प्रतिबंध घालण्याबरोबरच आठवड्यातून दोनदा तरी रस्ते, दुभाजक स्वच्छ करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. पालिका आयुक्तांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन विविध कामांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. शहरातील रस्त्यांवरील धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी कोपरी आणि मुंब्रा येथील मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत प्रक्रिया होऊन निर्माण होणा-या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर त्याच पाण्याचा वापर करून प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले. ही कार्यवाही रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या तसंच रस्ते दुभाजकांमध्ये जास्तीत जास्त प्राणवायू बाहेर सोडणा-या विशेष वृक्षांची लागवड करण्याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email