कल्याणमधील पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांवर ३०७ अन्वये गुन्हा दाखल
(श्रीराम कांदु)
कल्याणमधील पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांवर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन बेटावदकर हे एका वृत्त संकलनासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते. ठाण्यातील पत्रकारांची हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होती. ठाणे शहर आणि जिल्हा पत्रकार संघटनेतर्फे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना या आशयाचं निवेदनही देण्यात आलं होतं. पोलीस आयुक्तांनी हल्लेखोरांवर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार केतन बेटावदकर यांच्यावर हल्ला करणा-या ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: