मनसे नि लक्ष घातल्यामुळे डोंबिवलीतील शेकडो कुटुंबांना न्याय मिळाला!

श्रीराम कांदू
कल्याण-डोंबिवलीमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेवरील शर्तभंगाची प्रकरणे अखेर जवळपास दोन दशकांच्या लढ्यानंतर निकाली निघण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील ओक दाम्पत्याने या प्रश्नावर कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्यासमोर संपूर्ण विषय मांडला. त्यावर मा. राजसाहेबांनी या रहिवाशांच्या शिष्टमंडळासह २ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करताच आठ दिवसांतच स्वतः तलाठी संबंधित कागदपत्रे घेऊन ओक यांच्या घरी आले. या प्रकरणामुळे या मुद्द्यावर सरकारी यंत्रणेशी लढा देणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील शेकडो रहिवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे शर्तभंगाचे प्रकरणही निकाली निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.